लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पिक विमा**नुकसान भरपाईची रक्कम 31 ऑगस्ट पूर्वी द्या* *कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे आदेश*

*चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पिक विमा*
*नुकसान भरपाईची रक्कम 31 ऑगस्ट पूर्वी द्या*
 *कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे आदेश*

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर, दि. 8 : चंद्रपूर जिल्ह्यातील 2023-24 मधील ज्या शेतकऱ्यांचा पिक विमा नाकारण्यात आला आहे, त्यांना पात्र ठरवून 31 ऑगस्ट पूर्वी त्यांच्या खात्यात पीक विमा योजनेची नुकसान भरपाईची रक्कम जमा करावे, असे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीच्या अनुषंगाने मंत्रालयात आयोजित बैठकीचे बोलत होते. 
चंद्रपूर जिल्ह्यातील 2023-24 मधील खरीप हंगामात ३ लाख 50 हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभाग घेतला होता. या दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी पेरणी पश्चात तसेच नंतरही सर्व्हे झाला नसल्याचा तक्रारी केल्या होत्या. तसेच विमा कंपनीने पंचनामा व सर्वे न करताच शेतकऱ्यांना अपात्र ठरवल्याच्या तक्रारी सुद्धा प्राप्त झाल्या होत्या. 
त्यांना नुकसान भरपाईपोटी 208 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी 80 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून 127 कोटी रुपयांचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
पिक विमा कंपनीने वेळेत अपात्रतेची कारणे दिलेली नाहीत. त्यामुळे अपात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांना पात्र करावे लागेल. तसेच 31 ऑगस्ट पूर्वी नुकसान भरपाई त्यांच्या खात्यात देण्यात यावी असे स्पष्ट निर्देश यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
या बैठकीस कृषी विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती राधा कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण विनयकुमार आवटे, विभागीय कृषी संचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
००००००

Comments