वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त घोडपेठ येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन*

*उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त घोडपेठ येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन*

 अतुल कोल्हे भद्रावती :-
            शिवसेना उबाठाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शिवसेना उबाठाचे उपजिल्हाप्रमुख तथा भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजणे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील घोडपेठ येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत घोडपेठ  येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पेपर बोर्डचे वितरण सभापती भास्कर ताजणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर लगतच्या निंबाळा येथील अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख तुमराम, मुख्याध्यापिका उरकुडे, वडेट्टीवार मॅडम, रगटाटे मॅडम, भाग्यश्री केराम, सुजाता खडके, परमेश्वर ताजने, प्रकाश देवतळे, देवेंद्र रामटेके, सुनील चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संतोष इखारे, मदन शेरकी, प्रवीण ताजने, राजू भोंगळे, प्रकाश पिंपळकर, रवी माणूसमारे आदींनी सहकार्य केले.

Comments