वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे थकीत वीज बिल माफ व शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार अनुदान *किशोर टोंगे यांच्या मागणीला यश

*शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे थकीत वीज बिल माफ व शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार अनुदान *
किशोर टोंगे यांच्या मागणीला यश

वरोरा :- 


          राज्यातील शेतकऱ्यांना नेहमीच अस्मानी संकटाबरोबरच अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असतो. या वर्षी देखील विदर्भातील शेतकऱ्यांना सोयाबीनची नापिकी झाली असून त्यासोबत कापूस, धान,इ. मालाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना शेती न परवडणारी झाली होती.

आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना आता कृषीपंपाचे वीज बिल अनेक शेतकऱ्यांना हजारोच्या घरात आलेली आहेत. आधीच शेतकरी हवालदिल झाला असताना त्याची पूर्ण वीज बिल भरण्याची परिस्थिती नव्हती.

त्यामुळे शासन स्तरावर आढावा घेऊन ते कमी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा व शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
तसेच शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाची नुकसान भरपाई मिळावी यासाठी किशोर टोंगे यांनी आंदोलन केले होते व वेळोवेळी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. या दोन्ही मागण्या आज अर्थसंकल्पात पूर्ण झाल्यात याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच शेतकऱ्यांनी नवीन वीज जोडणी साठी दोन ते तीन वर्षापासून अर्ज केलेले आहेत, डिमांड देखील भरलेले आहेत मात्र अद्याप त्यांना वीज जोडणी मिळालेली नाही. त्यांना तात्काळ वीज जोडणी उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केली व या निर्णयाबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने महायुती सरकारचे आभार मानले.

Comments