वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*शहराजवळ आढळला नील गाईंचा कळप*वरोडा : शाम ठेंगडी

*शहराजवळ आढळला नील गाईंचा कळप*
वरोडा : शाम ठेंगडी 
 वरोडा शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेतात आज 29 फरवरी रोज गुरुवारला नील गाईचा कळप दिसून आला. शहराच्या इतक्या जवळ नीलगाईचा कळप आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
     वरोडा मार्डा रस्त्यावरील इंण्डेन गॅस कंपनीच्या गोडाऊन समोर असलेल्या एका शेतात आज 29 फरवरी रोज गुरुवारला दुपारी दोनच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या वाटेकरुंना पहिल्यांदा दोन नीलगाई आढळल्या. काही वेळानंतर या दोन गाईंच्या  एका मागून एक नीलगाय निघून आल्या. या कळपात सहा  निलगाईच्या बछड्यांसह एकूण 19 नीलगाई असल्याचे दिसून आले.
          शेताच्या बाजूला असलेल्या बाभळीच्या वनात हा कळप थोड्या वेळानंतर निघून गेला.

Comments