वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

बरांज प्रकल्पग्रस्त महिलांचा जलसमाधीचा इशारा : पोलीस बल खाण परिसरात तैनात**काल पासून अद्यापही वीस महिला खान परिसरातील खोदलेल्या खड्यातच*

*बरांज  प्रकल्पग्रस्त महिलांचा जलसमाधीचा इशारा : पोलीस बल खाण परिसरात तैनात*

*काल पासून अद्यापही वीस महिला खान परिसरातील खोदलेल्या खड्यातच*

*उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तथा पोलीस प्रशासनाचे घटनास्थलळावरील परिस्थितीवर लक्ष*

अतुल कोल्हे भद्रावती :-
              आपल्या विविध मागण्यांना घेऊन बरांज येथील प्रकल्पग्रस्त महिलांचे गेल्या तीन महिन्यांपासून एमटा कोळसाखान परिसरात आमरण उपोषण सुरू आहे. अद्याप पर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात न आल्याने व प्रशासनाने व इतर यंत्रणांनी या उपोषणाची दखल न घेतल्याने आंदोलन कर्त्या महिलांनी आक्रमक पवित्रा घेत जलसमाधी घेण्याचा इशारा दिला असुन प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
 परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी घटनास्थळी पोलीस दल, दंगा नियंत्रण पथक तथा आपत्ती व्यवस्थापन पथक तैण्यात करण्यात आले आहे. दरम्यान दिनांक 9 ला विस आंदोलनकारी महिला खाण परिसरातील एका पाणी भरलेल्या खड्ड्याजवळ गोळा झाल्या व पाणी भरलेल्या खड्यात उतरल्या होत्या मागण्या पुर्ण करु असे आश्वासन देण्यात आल्यानंतर दहा महिला खड्यातून बाहेर पडल्या मात्र आश्वासन लेखी द्या अशी मागणी करीत उर्वरीत विस महिला काल पासून अद्यापही खड्यातच आहे. दरम्यान घटनास्थळी  उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तथा पोलीस प्रशासन घटनास्थळी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व अनुचीत प्रकार रोखण्यासाठी सर्व यंत्रणा घटनास्थळी सज्ज झाल्या आहेत. बरांज गावाचे पुनर्वसन करावे, प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी. अशा अनेक मागण्यांना घेऊन बरांज येथील प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणा दरम्यान प्रकल्पग्रस्त महिला व कंपनी प्रशासनामध्ये अनेक बैठकी पार पडल्या. मात्र, या सर्व बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने प्रकल्पग्रस्त महिलांचे उपोषण अद्यापही सुरूच आहे. यावर कोणताही तोडगा न निघाल्याने व मागण्या अद्याप पर्यंत पूर्ण न झाल्याने आंदोलन करत्या महिलांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण करण्यात येत नाही,तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार सदर आंदोलनकारी महिलांनी बोलून दाखवला आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.सदर तिन महिन्यांपासून सुरु असलेल्या या ऊपोषणामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ ऊडाली आहे.

आजपर्यंत कंपणीने व प्रशासनाने  अनेक आश्वआसने देऊन वेळ मारुन नेली आहे.मात्र प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या अद्याप तशाच आहे.त्यामुळे कंपणी तथा प्रशासनवर आमचा विश्वास राहील नसुन जोपर्यंत प्रकल्पग्रस्तंच्य मागण्या पूर्ण पुर्ण केल्या जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल असे प्रकल्पग्रस्त महिलांकडून सांगण्यात आले आहे.

Comments