वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

नारायणी सन्स इंडिया प्रा . लि . कंपनी विरोधात यलगार

नारायणी सन्स इंडिया प्रा . लि . कंपनी विरोधात यलगार

भद्रावती

शिवसेना नेते किरण भाऊ पांडव यांचे सूचनेनुसार  नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांनी स्थानिकांच्या रोजगार व वेतनाच्या मुद्द्यावर माननीय जिल्हाधिकारी विनयजी गौडा साहेब यांना निवेदन देऊन कर्नाटका एम्टा बरांज माईन्स मधील नारायणी सन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तर्फे कामगारांचा होत असलेल्या शोषणाबाबत कामगारांना मागील 80 दिवसापासून न दिलेल्या पगाराबाबत निवेदन सादर केले .जवळपास 125 कामगारांचे मागील 80 दिवसापासून वेतन कंपनीकडे थकीत आहेत यामुळे कामगारांवर उपासमारीची पाळी येऊन कामगारांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे .त्यांच्या पालनपोषणाची व शिक्षणाची अतोनात अवहेलना होत आहे . याची दखल घेऊन माननीय नितीन मत्ते यांनी कंपनीने कामगारांचे वेतन तत्काळ देण्यात यावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कंपनी विरोधात यलगार केला यावेळी प्रतिमा ताई ठाकूर महिला आघाडी जिल्हा प्रमुख चंद्रपूर व भरतजी गुप्ता महानगर प्रमुख चंद्रपूर हे उपस्थित होते

Comments