वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयानंतर वरोऱ्यात जल्लोष

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयानंतर वरोऱ्यात जल्लोष
वरोरा :  शिवसेनेच्या शिंदे गटाचे बारा आमदार अपात्र करण्यासंदर्भातील प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय देताना शिंदे गटाची शिवसेना खरी शिवसेना असल्याचे घोषित करून शिंदे गटाचे कोणतेही आमदार अपात्र होणार नाही असा निर्णय दिला. हा निर्णय येतात चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्यासह शिवसैनिकांनी आनंदवन चौकामध्ये ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करून आनंद उत्सव साजरा केला.
यावेळी स्थानिक शिवसेना कार्यालयात मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांच्यासह अनेक कार्यकर्ते आनंदवन चौक येथे उपस्थित होते .

Comments