वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पदनियुक्ती सोहळा संपन्न*.

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पदनियुक्ती सोहळा संपन्न*.   

         श्रमिक पत्रकार भवन चंद्रपूर येथे मा. राष्ट्रीय सचिव माजी आमदार राजेंद्र जैन साहेब यांच्या हस्ते व ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. श्री. अजितदादा पवार साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.खा.श्री.प्रफुल पटेल साहेब व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.खा.श्री सुनील तटकरे साहेब यांच्या मान्यतेने श्री.विलासराव नेरकर यांच्यावर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वरोरा विधानसभा अध्यक्षपदाची  धुरा सोपवण्यात आली. 
त्यामुळे वरोरा विधानसभा क्षेत्रात कार्यकर्ते मध्ये
आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच वरोरा तालुकाध्यक्षपदी रविंद्र भोयर सरपंच ग्रामपंचायत येन्सा व वरोरा शहराध्यक्षपदी श्री चंद्रकांत कुंभारे यांची निवड करण्यात आली. भद्रावती तालुकाध्यक्षपदी श्री राजू बोरकर भद्रावती, शहराध्यक्षपदी गितेश सातपुते यांची निवड करण्यात आली. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments