वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

कांदा अनुदानात दोन कोटी तीस लाखाचा अपहार

कांदा अनुदानात दोन कोटी तीस लाखाचा अपहार

वरोरा

 : कांद्याचे दर पडल्यामुळे शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले.  या अनुदानाकरिता अनेक शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली. यादीमध्ये आपल्या नावाचा समावेश आहे. याची कल्पना अनेक शेतकऱ्यांना नव्हती. आता अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले, ते अनुदान परत मागितले जात आहे. यामध्ये दोन कोटी तीस लाखाचा अपहार झाल्याची तक्रार शेतकरी व काही बाजार समिती संचालकांनी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे केली. आमदार धानोरकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आज मुंबई येथे भेटून मंत्रालयात  पणन मंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन दिले आहे. तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित  दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी मंत्री महोदयांनी दिले. 

राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी फेब्रुवारी 23 ते मार्च 23 या कालावधीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती खाजगी बाजार परवानाधारक व्यापारी नाफेड यांच्याकडे कांदा विकला त्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल तीनशे पन्नास रुपये अनुदान जाहीर केले.  वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने अनुदानास पात्र असलेल्या 676 लाभार्थ्यांची यादी तयार केली.  त्या लाभार्थ्यांच्या खात्यात दोन कोटी तीस लाख 73 हजार रुपये जमा झाले. आता ही जमा झालेली रक्कम शेतकऱ्यांकडून मागितली जात आहे. त्यामुळे प्रकरण बाहेर येत आहे. बाजार समिती मध्ये नाफेड कडे चना विक्री करण्याकरिता शेतकरी सातबारा आधार कार्ड बँक पासबुक याच्या साक्षांकित प्रती देत असतात त्याचाच वापर केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला. वरोरा बाजार समितीमध्ये मागील पाच वर्षापासून भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार झाले नाही. कृषी विभागाकडून कांद्याच्या उत्पादकतेचा अहवाल घेण्यात आला नाही. उन्हाळी कांद्याचापेरीव पत्रात उल्लेख आहे परंतु 40 टक्के शेतकऱ्यांकडे बारमाही जलसिंचनाचे साधन नसताना उन्हाळी कांद्याचे 30000 क्विंटल उत्पादन झाले कसे, असा प्रश्नही तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. 
अनुदानाकरिता अर्ज दाखल केलेल्या  शेतकऱ्यांना याची कल्पना नसल्यामुळे त्यांच्या स्वाक्षऱ्या बनावट असल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची दखल आमदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतली असून या प्रकरणाची चौकशी राज्याच्या पणन संचालकाकडे तक्रार करण्यात आली आहे. तसेच आज आज मुंबई येथे भेटून मंत्रालयात  पणन मंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन दिले आहे. या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही मंत्री महोदयांनी दिली आहे. 


ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कांदा अनुदानाची रक्कम जमा झाली आहे.  त्या शेतकऱ्यांनी व्यापारी किंवा त्यांच्याकडे आलेल्या व्यक्तीला अनुदानातील रक्कम देऊ नये असे आवाहन आमदार प्रतिभा धानोरकर केले आहे.

Comments