वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

डॉक्टर सागर वझे यांचा स्तुत्य उपक्रम

तालुक्यातील 15 मंदिरे व शाळेला लाऊड स्पीकर संच वाटप करणार.

डॉक्टर सागर वझे यांचा स्तुत्य उपक्रम

वरोरा 
2 ऑगस्ट2023

     वरोरा तालुक्यातील धार्मिक आणि शैक्षणिक संस्थांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे नित्य उपयोगात येणाऱ्या ध्वनिशेपकाची(लाऊड स्पीकर)  गरज लक्षात घेता भाजप युवा नेते आणि गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर सागर वझे यांनी वरोरा तालुक्यातील मंदिरे आणि शैक्षणिक संस्थांना ध्वनीशेपक भेट देण्याचा संकल्प केला आहे. नुकतेच सरदार पटेल वार्डातील हनुमान मंदिराला त्यांनी एक ध्वनी संच भेट दिला.
       वरोरा शहरासह तालुक्यातील मंदिरांमध्ये नित्यनियमाने पूजा अर्चना होत असते. त्या ठिकाणी ध्वनि क्षेपकाची व्यवस्था नसल्यामुळे मंदिरांना अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच यामध्ये प्रार्थनेच्या वेळी आणि कार्यक्रमाकरिता हीच अडचण येत असल्याचे लक्षात येताच डॉक्टर सागर वझे यांनी पहिल्या टप्प्यात 15 मंदिरांना आणि निमशासकीय शाळांना ध्वनिक्षेपक देण्याचा संकल्प केला आहे. नुकतेच त्यांनी मॅमोग्राफी शिबिराचे आयोजन करून  स्तनाच्या कॅन्सर च्या गरजू रुग्णांना मोफत उपचार दिले होते हे विशेष.
      नुकत्याच सरदार पटेल वार्डात हनुमान मंदिराला भेट दिलेल्या  कार्यक्रमात रवी शिंदे, शरद यादव, किरण कामडी, सौरभ लोहकरे, उज्वल लोहकरे, सुधाकर कुंकुले बजरंग यादव आदी उपस्थित होते.

जाहिरात 

Comments