वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

माजी.खासदार बाळू धानोरकर यांना वरोराकरांची भावपूर्ण श्रद्धांजली

*खासदार बाळू धानोरकर यांना वरोराकरांची भावपूर्ण श्रद्धांजली* 
 
फक्त बातमी 
चेतन लूतडे वरोरा


चंद्रपूर -वणी- आर्णी लोकसभा क्षेत्राचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली
अर्पण करण्यासाठी बुधवारी वरोरा येथील आंबेडकर चौकात सर्वपक्षीय सभा पार पडली. वरोऱ्यातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व व्यापारी संघटनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी माजी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या आठवणीला उजाळा देत त्यांच्या आठवणी सभेमध्ये बोलून दाखवल्या. यावेळी धानोरकर शोकाकुल परिवारातील आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना सांत्वना देत आप्तेष्ट मंडळीनी  भेटी दिल्या.आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जनतेला बाळूभाऊचे उर्वरित स्वप्न आपण नक्की पूर्ण करणार अशी ग्वाही देत श्रद्धांजली अर्पण केली. आणि विरोधकांना आपल्या शैलीत इशारा देत "मी पण बाळूभाऊ धानोरकर यांची पत्नी आहे."असे सूचक वक्तव्य करत येणाऱ्या संकटांना तोंड देण्याची हिंमत त्यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवली.
 या कार्यक्रमासाठी अखील भारतीय गुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पत्नी ,आमदार सौ.प्रतिभाताई धानोरकर, भाऊ भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर , पुत्र मानस धानोरकर , प्रवीण काकडे उपस्थित होते. 
           लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील, डॉ. राजेंद्र ढवस, शिवसेना(ठाकरे गट) जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जंयत टेंमूर्डे भारतीय जनता पक्षाचे बाबा भागडे,माजी जी.प. सभापती प्रकाश मुथा, विलास नेरकर, विलास टिपले, राजेंद्र चिकटे, योगेश डोंगरवार,मॉर्निंग वॉकग्रुपचे सचिव बंडू देऊळकर, गांधी उद्यान योग मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नेमाडे,
या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या सभेसाठी वरोरा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. सुचेता पद्मावार यांच्या श्रद्धांजलीपर गीत गायनाने परिसर भाऊक झाला होता.

Comments