वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

पोलिसांची अवैध तंबाखू विक्री दुकानदारावर कारवाई.*प्रभारी पोलीस अधिकारी रांजणकर यांची धडक कारवाई.*अंदाजे सहा लाख रुपयाचा सुगंधी तंबाखू जप्त.

पोलिसांची अवैध तंबाखू विक्री दुकानदारावर  कारवाई.

प्रभारी पोलीस अधिकारी रांजणकर यांची धडक कारवाई.

अंदाजे सहा लाख रुपयाचा सुगंधी तंबाखू जप्त.

वरोरा
चेतन लूतडे 

वरोरा तालुक्यातील खांबाडा येथील  भोयर यांच्या दुकानातून लाखो रुपयाचा सुगंधी तंबाखू जप्त केला असून वरोरा पोलीस ठाणेदार या संबंधात कारवाई करत आहे.
मागील बऱ्याच वर्षापासून खांबाडा परिसरात हिंगणघाट येथून  सुगंधी तंबाखू आणल्या जात असल्याची खबर पोलिसांजवळ होती. या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून खांबाडा परिसरातील घरात साठवून ठेवलेला सुगंधी तंबाखू जप्त केला. तंबाखू तीन ठिकाणावरून जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात दुकानदार विलास भोयर यांना वरोरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून यांच्यासह  दोन जण असून आहेत. पोलीस यासंबंधीत बरीच माहिती गोळा करीत असल्याचे दिसले. 

मागील कित्येक वर्षापासून हा व्यवसाय वरोरा तालुक्यात   मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रत्येक कॉलेज, शाळा , हॉस्पिटल, मंदिरे यांच्याजवळ बिनधास्तपणे गुटखा, खरा, तंबाखू विक्री करीत असताना दिसत आहे. मात्र आतापर्यंत कारवाई दिसून आली नाही.
 मात्र नवीन प्रभारी पोलीस अधिकारी रांजणकर नियुक्ती झाल्यावर सहा लाखाचा सुगंधित तंबाखू प्रथमच पोलिसांना गवसला त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन खांबाडा गावातील जनता करत आहे.  याच पद्धतीने येथील सट्टा बाजार  बंद करावा अशी व्यथा सुद्धा व्यक्त करीत आहे.

Comments