वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भद्रावती शहर प्रमुख आशिष ठेंगणे यांच्या पुढाकाराने पक्षप्रवेश व शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात*

चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते  यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भद्रावती शहर प्रमुख आशिष ठेंगणे यांच्या पुढाकाराने पक्षप्रवेश व शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात*

*शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आदेशानुसार तथा श्री किरण भाऊ पांडव पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख यांचे सूचनेनुसार श्री नितीन भाऊ मत्ते यांचे नेतृत्वात तथा सौ योगिताताई लांडगे यांचे मुख्य उपस्थितीत श्री आशिष ठेंगणे शहर प्रमुख भद्रावती यांचे विशेष पुढाकाराने भद्रावती शहरामध्ये पक्षप्रवेश सोहळा व शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला जोरदार सुरुवात करण्यात आली . श्री कमलाकांजी कळसकर माजी ग्रामपंचायत सदस्य चेक बराच ग्रामपंचायत व त्यांच्या समर्थक सदस्यांनी आज श्री नितीन मते यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला यावेळी बोलताना श्री नितीन मते यांनी शिवसेना सदस्य नोंदणी व शिवसेना पक्षाचे विशेष महत्त्व पटवून दिले तसेच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्याचे महत्व कार्यकर्त्यांना पटवून दिले व एकनाथजी शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी भद्रावती शहरांमध्ये प्रत्येक वार्डात शिवसेनेची शाखा उघडण्याची सूचना शहर प्रमुख आशिष ठेंगणे  यांना व उपस्थित सदस्यांना केली . तसेच श्रीआशिष ठेंगणे यांनी यावेळी बोलताना म्हणाले भद्रावती शहरामध्ये येणाऱ्या काही दिवसात अनेकांचे पक्षप्रवेश व प्रत्येक वार्डात शिवसेनेच्या शाखा निर्माण करण्याचा विश्वास श्री नितीन भाऊ मत्ते यांना दिला व संपूर्ण ताकदीने शिवसेना सदस्य अभियान भद्रावती शहरामध्ये राबवण्यात येईल असा सुद्धा विश्वास त्यांनी श्री नितीन मते यांना दिला यावेळी अनेक वार्डातील मुख्य कार्यकर्त्यांनी  पक्षप्रवेश घेतला त्यामध्ये श्री कमलाकांजी कळसकर माजी ग्रामपंचायत सदस्य चेकबरान ग्रामपंचायत, श्री नरेंद्र येवले विजासन, सौ करुणा संजय मोघे गुरुनगर, प्रमोद कुमरे बाजारवार्ड, राजेश नागपुरे झिंगुजी वार्ड, श्री संतोष बोमीडवार गौराळा वार्ड यांनी पक्षप्रवेश घेतला यावेळी ज्योतीताई लांडगे तालुकाप्रमुख महिला आघाडी, उषाताई आमटे चेतन घोरपडे हे उपस्थित होते*

Comments