वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

शेतकऱ्यांच्या बैलाच्या दलालीतून खिसे गरम

शेतकऱ्यांच्या बैलाच्या दलालीतून खिसे गरम

वरोरा 19/jun23
चेतन लूतडे वरोरा 

वरोरा तालुक्यातील सर्वात मोठा बैल बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अनेक जणांचे खिसे गरम होत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा मध्ये सभापती विजय देवताळे उपसभापती जयंत टेंमूर्डे यांची नवीन कार्यकारिणी बसल्यानंतर कर्मचारी व इतर सदस्यांवर वचक नसल्याची बाब समोर येत आहे. रविवारी भरत असलेल्या बैल बाजारामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे प्रत्येक बैलावर एन्ट्री फी पाच रुपये व खरेदीवर 2.10 शेकडा  शेष आकारला जातो. यामध्ये साक्षांकन फी , बाजार फी, देखरेख फी असे वर्णन नमूद केले असते.मात्र ह्या पावती व्यतिरिक्त पैसे आकारून कर्मचारी व काही व्यक्तींच्या खिशात अतिरिक्त पैसे जात असल्याची बाप चर्चेत आली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे नुकसान होत असून याला आळा घालण्यासाठी नवीन सभापतीने लक्ष देणे गरजेचे आहे.

Comments