1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

भद्रावती येथील मांगली गावातील मंदीरातील दुहेरी हत्याकांडातील आरोपीं पकडण्यात पोलीसांना यश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पोलीसांनी एका आरोपीस केले अटक

भद्रावती येथील मांगली गावातील मंदीरातील दुहेरी हत्याकांडातील आरोपींचा

लावण्यात पोलीसांना यश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पोलीसांनी एका आरोपीस केले अटक

वरोरा
चेतन लूतडे 
दिनांक २३/०३/२०२३ रोजी फिर्यादी नामे मंगेश बाबुराव खारकर वय ४२ वर्ष, रा. मांगली यांनी रिपोर्ट दिली की, दिनांक २२/०३/२०२३ ते २३/०३/२०२३ रोजी रात्रौ दरम्यान त्यांचे शेतातील जगन्नाथ बाबा मंदीरात त्याचे वडील (मृतक) नामे बाबुराव संभाजी खारकर वय ८० वर्ष व शेजारील शेतकरी (मृतक) बामे मधुकर लटारी खुजे वय ६५ वर्ष दोन्ही रा. मांगली हे मंदिरा मध्ये देखरेखीकरीता झोपले असता कोणीतरी अज्ञात चोरांनी मंदीरात चोरी करण्याच्या उद्देशाने हत्यारासह प्रवेश करुन नमुद मृतक हयांना हत्याराने त्यांचे डोक्यावर वार करून जिवानिशी ठार मारले व मंदीरातील दानपेटीचे कुलूप तोडुन दानपेटीतील नगदी रक्कम अंदाजे २०००/- चोरून नेले व दानपेटी काही अंतरावर फेकुन दिली. अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरुन पोस्टे भद्रावती येथे अपराध क्रमांक १४० / २०२३ कलम ३०२, ४५८, ४६०, ३८० भादंविचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे आदेशान्वये श्री आयुष नोपानी, सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांचे कडे देण्यात आला. मौजा मांगली येथील मंदीरामध्ये झालेल्या  दुहेरी हत्याकांडात आजुबाजुच्या परिसरातील लोकांमध्ये दहशत निर्माण होवु नये म्हणुन सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक यांनी पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळी ८ विशेष तपास पथके तयार करुन सर्व दृष्टीकोणातुन तपास सुरु केला. त्याप्रमाणे स्थानिग गुन्हे शाखेचे पोनि श्री महेश कोंडावार यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे विशेष पथके तयार करून  हत्याकांडातील आरोपींचा शोध घेण्यासाठी घटनास्थळ व आजुबाजुच्या परिसरात रवाना केले. नमुद पथकाने गोपनिय माहिती व कौशल्यपूर्ण तपास करून एका आरोपीस ताब्यात घेवुन गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने त्याचे साथीदारासह मौजा मांगली येथील जगन्नाथ बाबा मंदीरात दानपेटी मधील पैसे चोरी करण्यासाठी गेले असता, मंदीराचे दार उघडत असतांना दाराच्या आवाजाने मंदीरात झालेले मृतक इसम हे जागे झाल्याने त्यांना चोरी करण्यास अडथळा निर्माण होवु नये व त्याचे बिंग फुटू नये या उद्देशाने त्यांनी अत्यंत कुरतेने त्यांच्या हातात असलेल्या हत्याराने वर नमुद मृतकांच्या डोक्यावर तसेच चेह-यावर कुरपणे वार करुन जागीच जिवानिशी ठार मारले. व मंदीरातील दानपेटी घेवुन पसार झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आले. नमुद आरोपीस मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी भद्रावती यांचे न्यायालयात हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यास पाच दिवस पोलीस कोठडी रिमांड दिला असुन गुन्हयातील इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
अशा प्रकारे अत्यंत संवेदनशिल व गुंतागुतींच्या व क्लिष्ट स्वरुपाच्या गुन्हयाचा बुध्दीचार्तुयाने कौशल्यपूर्ण तपास करुन गुन्हा उघडकीस आणण्याची कार्यवाही श्री रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, रिना जनबंध अपर पोलीस अधीक्षक चंदूपर, श्री आयुष नोपानी, सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा, श्री सुशिलकुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदुर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री महेश कोंडावार, पोनि श्री विपीन इंगळे, पोस्टे भद्रावती, सपोनि श्री जितेंद्र बोबडे, श्री सुधीर वर्मा, श्री अजित देवरे, श्री विशाल मुळे, पोउपनि श्री विनोद भुरले, श्री अतुल कावळे, श्री अमोल कोल्हे, श्री अमोल तुळजेवार तसेच पोहवा संजय अतुकलवार, नितीन साळवे, प्रकाश बल्की, सुभाष गोहोकार, रजनीकांत पुठठेवार, विजय नागपूरकर, अली गुजावर, अर्जुन गडावी, नापोशि संतोष येलपुलवार, प्रशांत लारोकर, छगन नांभुळे, पोशि गोपाल अतकुलवार, नितीन रायपुरे, रविंद्र पंथरे, नरेश डाहुले, कुंदनसिंग बावरी, प्रांजल झिलपे, मिली सतिश बगमारे, अमोल सावे, वैभव पत्तीवार, दिनेश अराडे यांनी केली असुन पुढील तपास श्री अ उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा हे करीत आहेत.

Comments