वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

शहीद डाहुले चौकात लालपरी फेल शहरातील वाहतुकीचा खोळंबा.

शहीद डाहुले चौकात लालपरी फेल

शहरातील वाहतुकीचा खोळंबा.

वरोरा
चेतन लूतडे

वरोरा आगार येथून निघालेली अहेरी डेपोची लाल परी भर चौकात बिघडल्याने वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला. शहीद डाहूले चौकामध्ये तीन वाजताच्या दरम्यान वरोरा आगारामधून बस क्रमांक एम एच 40 वाय 5970 ला विभागीय कार्यशाळा चंद्रपूर येथे नेण्यासाठी जुगाड तयार करून  बस- ट्रकला बांधून नेण्यासाठी काढण्यात आले. मात्र वरोरा आजारातूनच निघालेला बस ट्रक  चे जुगाड शहीद डावले चौकात जाऊन रस्त्याच्या मधोमध तुटले आणि तेव्हापासून ही बस या चौकाच्या थांबून आहे. 
वरोरा आजाराचे व्यवस्थापक ही बस हलवण्यासाठी नवीन प्रयत्न करून राहिलेले आहे. मात्र संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत प्रयत्न  असफलच ठरले. या गाडीची पाहणी करण्यासाठी आगाराचे कर्मचारी ठेवण्यात आले आहे. मात्र नवीन जुगाडाची वाट पाहून पाहून तेही थकले. यामुळे वरोरा शहरात जाणारा रस्ता वरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून लवकरात लवकर बस हलवावी असा प्रयत्न सुरू आहे.
या गाडीची इंजन पूर्णतः खराब झाले असून दुसरी बस किंवा ट्रक येईल तोपर्यंत लाल परी शहीद डावले चौकात मुक्काम करणार.
ट्राफिकला जरी अडथळा निर्माण झाला असला तरी ट्राफिकचे कोणतेही नियम या लाल परीला दिसत नाही. साधे रेडियमचे स्टिकर सुद्धा दिसत नाही. एरवी साधी गाडी जरी बंद पडली तरी महामार्गावरील पोलीस किंवा ट्राफिक पोलीस विचार ना तरी करतात.
मात्र आगार व्यवस्थापक डोंगरकर यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता वेल्डिंग साठी कर्मचारी शर्तीचे प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.

मात्र गेल्या चार तासापासून ही गाडी या ठिकाणी आहे आणि संबंधित प्रशासनाचे मात्र अजूनही लक्ष नाही.

पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर साडेआठच्या सुमारास ही बस इथून काढण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.


Comments