वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

वरोरा तालुक्यातील आटमुर्डी ग्रामपंचायतवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचा भगवा फडकवला*

*वरोरा तालुक्यातील आटमुर्डी  ग्रामपंचायतवर  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचा भगवा फडकवला*

वरोरा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे व युवासेना जिल्हा प्रमुख मनीष जेठानी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक माजी सरपंच  आटमुर्डी विठ्ठल जोगी यांच्या नेतृत्वात आटमुर्डी ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार निवडुन आले.
यात शिवा राजु वराटकर यांनी मोहन साळवे यांचा ४० मतांनी तर
 तसेच प्रेमीला जयदेव लभाने यांनी भूपेंद्र लभाने यांचा ४० मतांनी पराभव करून विजय प्राप्त केला.
यावेळी निवडुन येणाऱ्या दोन्हीही उमेदवारांचे शिवसेना जिल्हा कार्यालय वरोरा येथे शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या हस्ते शाल श्रीफळं व पुषगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला युवासेना जिल्हा प्रमुख मनिष जेठानी,  शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, शहर प्रमुख संदीप मेश्राम, युवासेना जिल्हा सनमव्यक दिनेश यादव, शिवदुत बंडुजी डाखरे,शिवदुत रामशोक दडमल, शिवसेना विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे, उपतालुका प्रमुख लक्ष्मण ठेंगणे, जेष्ठ शिवसैनिक पुण्यवान तुराणकर, युवासेना उपतालुका प्रमुख अक्षय  झिले, शिवसेना उपशहर प्रमुख राहुल दारुण्डे, अनिल गाडगे, अतुल नांदे,गजानन बोढे,प्रवीण खिरटकर,रवींद्र लभाने,वैभव वराटकर,आकाश पाकमोडे, चेतन साळवे, अनिकेत उईके, राजेंद्र पाकमोडे, अमित खारकर, अतुल किन्नाके आणि पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.
आटमुर्डी ग्रामपंचायतवर सरपंच पदाचे उमदेवार म्हणून शिवा राजु वराटकर यांची वर्णी लागणार तसेच पुढे येणाऱ्या निवडणुकीत  शिवसेनेचा भगवा फडकवणार असा विश्वास शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी व्यक्त केला .

जाहिरात 

Comments