वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

वर्धा नदीत बोटीसह चारजन वाहून गेले.

वर्धा नदीत बोटीसह चारजन  वाहून गेले.

वरोरा
चेतन लूतडे

वरोरा तालुक्यातील दिंडोदा गावानजीकच्या वर्धा नदीवर धरण बांधण्याचे काम मागील काही महिन्यापासून सुरू आहे .या प्रकल्पात चंद्रपूर, यवतमाळ ,वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जमीन गेली आहे .प्रकल्प उभारणी करिता मध्य प्रदेश मधील मजूर आणले असून ते काम सुरू असलेल्या ठिकाणी वास्तव्यास आहेत .मागील काही दिवसापासून सतत पाऊस पडत असल्याने वर्धा नदीमध्ये दोन्हीही काठावर पाणी आले आहे.

बुधवारी सकाळी चार वाजताच्या सुमारास प्रकल्प बांधणाऱ्या कंपनीच्या बोटीने चार व्यक्ती नदीच्या पाण्यामधील साहित्य काढत असताना बोट पाण्यात उलटली यात बोटीसह चार व्यक्ती पाण्यात वाहू लागल्याने उपस्थित नागरिकांनी आरडाओरड केली त्यामुळे काही नागरिकांनी सतर्कता बाळगता सोईट गावा जवळच्या वर्धा नदीच्या पुलाजवळ पाण्यामध्ये उतरून चारही व्यक्तींना पकडले व सुखरूप बाहेर काढले चार व्यक्तीची व त्यांना वाचवणाऱ्या नागरिकांची नावे मात्र करू शकले नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
अकरा योग पटूंचे बंगाल येथे राष्ट्रीय योग स्पर्धेसाठी निवड
अहिल्याबाई होळकर पुरस्कारने योगिता लांडगे सन्मानित

Comments