वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या युवासेना चंद्रपूर जिल्हाप्रमुख पदी सुर्या अडबाले.**जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करण्याचे धोरण*

*बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या युवासेना चंद्रपूर जिल्हाप्रमुख पदी सुर्या अडबाले.*

*जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करण्याचे धोरण*
चंद्रपूर:बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची ताकद चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे.पक्षातर्फे आज नवीन नियुक्ती करण्यात आलेली आहे. युवासेना जिल्हाप्रमुख पदी सुर्या अडबाले यांना संधी देण्यात आलेली आहे. 
    बाळासाहेबांची शिवसेना चे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,शिवसेना नेते खासदार डाँ.श्रीकांतजी शिंदे महाराष्ट्र  युवासेना सचिव किरणजी साळी, शिवसेना विदर्भ नेते किरण पांडव तसेच चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख मा.नितीन  मत्ते,चंद्रपूर जि.सहसंपर्क प्रमुख बंडुभाऊ हजारे यांच्या मार्गदर्शनखालील,
युवासेना महाराष्ट्र कार्यकारी सदस्य हर्षल शिंदे यांच्या नेतृत्वात
युवासेना चंद्रपूर जिल्हाप्रमुख पदी सुर्या अडबाले यांची आज नागपूर शिवसेना विभागीय कार्यालय येथे नियुक्ती करण्यात आली.त्यांचे सामाजिक कार्य पाहता चंद्रपूर जिल्हा युवासेनेची जबाबदारी त्यांच्या कडे सोपविण्यात आली आहे.

Comments