वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

खासदार स्थानिक विकास निधी योजनेतील रक्कम वाढवा अन्यथा खासदार निधी बंद करा*

*खासदार स्थानिक विकास निधी योजनेतील रक्कम वाढवा अन्यथा खासदार निधी बंद करा*

*खासदार बाळू धानोरकर यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांच्याकडे मागणी*

चंद्रपूर : खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी अंतर्गत खासदारांना पाच कोटी ऐवजी 30 कोटी रुपयांची रक्कम देण्यात यावी, अन्यथा ही योजना बंद करण्यात यावी अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांच्याकडे  केली आहे. 

              खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेसाठी भारत सरकारच्या माध्यमातून सर्व खासदारांना पाच कोटी रुपयांची रक्कम दिली जाते. लोकसभा मतदारसंघातील विकासाच्या दृष्टीने खासदारांना ही रक्कम देण्याचे उद्दिष्ट असून, खासदारांना त्यांच्या इच्छेनुसार आवश्य त्या ठिकाणी दिशा निर्देशानुसार खर्चाचे अधिकार आहेत, लोकसभा क्षेत्रामध्ये जवळपास सहा ते सात विधानसभा क्षेत्र असतात. त्याचे क्षेत्र 250 ते 300 किलोमीटर असते. एका लोकसभा मतदारसंघांमध्ये जवळपास दोन हजाराच्या आसपास गावे असतात. इतक्या मोठ्या क्षेत्रामध्ये पाच कोटी रुपयांचा निधी अल्पसा ठरत आहे. लोकसभा क्षेत्रामध्ये दौरे करताना विविध गावातील नागरिक निधीसाठी मागणी करतात. विकास कामासाठी निधी कमी पडला तर खासदारांवर रोष व्यक्त केला जातो.  महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा तसेच उत्तर प्रदेश येथील आमदारांना स्थानिक विकास निधी योजनेअंतर्गत पाच कोटी रुपयांची राशी प्राप्त होते, तर दुसरीकडे दिल्लीतील आमदारांना दहा कोटी रुपयांचे तर छत्तीसगडमध्ये चार कोटी व मध्य प्रदेश मध्ये तीन कोटी अशी निधीची तरतूद आहे. त्या तुलनेत खासदारांचे क्षेत्र सहापट मोठे असतानाही खासदार स्थानिक विकास निधीची रक्कम केवळ पाच कोटी आहे.  त्यामुळे या राशीमध्ये तीस कोटी रुपये अशी वाढ करण्यात यावी.  जर ते शक्य नसेल तर या निधीची तरतूद पूर्णतः बंद करण्यात यावी अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.

Comments