वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

अपघातात महिला डॉक्टरचा मृत्यू. डॉक्टर पती गंभीर जखमी

अपघातात महिला डॉक्टरचा मृत्यू. डॉक्टर पती गंभीर जखमी

वरोरा 

वरोरा शहराजवळ शेंबळ गावाजवळ भरधाव ट्रक ने वणीकडे येत असलेल्या कारला जबर धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला.  तब्बल अर्धा किलोमीटर पर्यंत कारला ट्रकने ओढत नेले. या भीषण अपघातात  तरुण महिला डॉक्टरचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाले असून त्यांना चंद्रपूर उपचारार्थ हलवले आहे. ही दुर्दैवी घटना बुधवार दि. 22 मार्चला दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडली.

डॉ. अश्विनी गौरकार- झाडे (31) असे मृतक डॉक्टर चे नाव आहे त्या पाच नंबर शाळे जवळ वास्तव्यास होत्या. तर त्या तीन दिवसापूर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर रुजू झाल्या होत्या. त्यांचे पती डॉ. अतुल गौरकार हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. ते वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे कर्तव्य बजावत होते.

डॉक्टर दाम्पत्य MH-34- AM- 4240 या कार ने वणीकडे येत होते तर विरुद्ध दिशेने ट्रक क्रमांक MH- 34- BZ- 2996 हा ट्रक भरधाव वेगात होता. अचानक दोन्ही वाहने समोरासमोर भिडली. अपघात भीषण होता, यावेळी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली. तसेच पोलिसांना सुचविण्यात आले. जखमींला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले.

Comments