वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समीती वरोरा श्रीराम मंदीर देवस्थान वरोरा, आयोजीत भव्य शोभायात्रा.

श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समीती वरोरा श्रीराम मंदीर देवस्थान वरोरा, आयोजीत भव्य शोभायात्रा.

श्रीराम मंदीर देवस्थान येथे चैत्र राम नवरात्र उत्सावा निमित्त दहा दिवस व्याख्यान मालाचे आयोजन करण्यात आले. विविध विषयावरील व्याख्यानमालेच्या सर्वांना अवश्य लाभ घ्यावा. तसेच श्रीराम जन्मोत्सव
शोभायात्रा समिती बसेश तर्फे भव्य शोभायात्रे चे आयोजन दि. ३०.०३. २०२३ रोज गुरुवारला श्रीराम मंदीर देवस्थान वरोरा रोकन करण्यात आले आहे. 

या भव्यदिव्य शोभायाचे स्वरूप आकर्षक झाकी, देखावे, भजन मंडली, मल्लखांब, हे शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. त्याचप्रमाणे वरोरा शहरातील विविध समाजांच्या या भव्य शोभायात्रे मध्ये सहभाग असणार आहे. त्यांच्या तर्फे अनेक वेगवेगळ्या चौकात स्टॉल देखील लावण्यात येणार आहे. या भव्य शोभायात्रेचा प्रारंभ श्रीराम मंदीर देवस्थान येथून निघुन, सावरकर चौक, ज्योतीबा फुले चौक, आंबडेकर चौक, नेहरू चौक, मित्र चौक,डोंगरावर चौक, जयभारतीय चौक आणी श्रीराम मंदीर वरोरा येथे ही शोभायात्रा पोहचणार आहे. अशी रूपरेषा या शोभायात्रेची असणार आहे. तरी या भव्य शोभायात्रेचा सर्व वरोरा वासियांना तसेच सर्व बाहेरील जनतेनी लाभ घ्यावा असे आव्हान श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती तर्फे करण्यात आले आहे



श्री राम जन्मोत्सव शोभायात्रा समिती 

अध्यक्ष - डॉ.राजेंद्र ढवस 
सचिव - डॉ विवेक तेला
उपस्थित  - मुकुलजी सायंकार , सुधीरजी मिश्रा  , परागजी दवंडे ,विनोजजी पद्मावार , पद्माकर खापणे , विजय जुनघरे , पंकज खाजोने , शुभम गोल्हर,, रवी काळे , डॉ सौरव ढवस , जितेश कायरकर , गौरव मेले  इत्यादी उपस्थित होते.

Comments