वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

वंधली सेवा सहकारी संस्थेवर शेतकरी परिवर्तन पॅनल चा दणदणीत विजय

वंधली सेवा सहकारी संस्थेवर शेतकरी परिवर्तन पॅनल चा दणदणीत विजय 

वरोरा तालुका प्रतिनिधि -
वरोरा तालुक्यातील वंधली येथील सेवा सहकारी संस्थेची नुकतीच निवडणूक पार पडली  असून या निवडणुकीमध्ये शेतकरी सहकार  परिवर्तन पॅनलचा दननीत विजय झाला आहे. एकूण बारा उमेदवारांपैकी  दहा उमेदवार परिवर्तन पॅनल चे विविध  जागेवर  निवडून आले. 
 निवडून आलेल्या संचालकामध्ये विठ्ठल उर्फ बाळू त्र्यंबकराव भोयर, शेखर मोरेश्वरराव चौधरी,अनिल रामचंद्र महल्ले, किशोर पांडुरंग टापरे , धनराज लक्ष्मण चौधरी, कवडू विठूजी पिसाळकर व किशोर पांडुरंग टापरे हे सर्वसाधारण शेतकरी प्रतिनिधी गटातून  आठ पैकी सात संचालक परिवर्तन पॅनल चे निवडून आले  असून अनुसूचित जाती जमाती गटामधून विठ्ठल शंकर घोडमारे ,महिला राखीव गटातून दर्शना चंद्रकांत धोटे व इतर मागासवर्गीय गटात संकेत संजय भोयर हे तीन उमेदवार असे  एकूण दहा उमेदवार परिवर्तन पॅनलचे चांगल्या मतांनी विजयी झाले .विशेष मागासवर्गीय गटातून अविरोध निवडून आलेले  गजानन पुंडलिक झीले यांनी देखील शेतकरी परिवर्तन पॅनलला पाठिंबा दिलाअसून शेतकरी परिवर्तन पॅनलचे  असे एकूण 11 उमेदवार विजयी झाले आहेत.
   सहकार परीवर्तन पॅनलचे नेतृत्व खरेदी-विक्रीचे संचालक व बाजार समितीचे माजी बांधकाम समिती सभापती बाळूभाऊ भोयर व  माजी सरपंच  तात्यासाहेब चौधरी यांनी केले असून या संस्थेवर अनेक वर्षापासून  काँग्रेस  प्रणित नेत्यांचे  वर्चस्व होते मात्र यावेळी वर्चस्व संपुष्टात आले आहे.
 परिवर्तन पॅनल छा विजय झाला झाल्याने गावात सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.
   दुसरे उभे असलेले शेतकरी विकास पॅनल चे नेतृत्व माजी अध्यक्ष प्रविण भोयर व तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर यांनी केले असून  शेतकरी विकास पॅनल चे प्रवीण भोयर  हे शेतकरी सर्वसाधारण प्रतिनिधी गटातून  तर महिला राखीव गटातून  अंजू प्रवीण भोयर असे दोनच उमेदवार निवडून आले. निवडणुक अधिकारी म्हणून येवले यांनी काम सांभाळले.

Comments