वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

विदर्भ स्तरीय "स्मृतिगंध" काव्य संमेलन गुंडावार सभागृहात संपन्न

विदर्भ स्तरीय "स्मृतिगंध" काव्य संमेलन  गुंडावार सभागृहात संपन्न 

वरोरा
दिपक शिव

स्व.विणा आडेकर स्मृती प्रतिष्ठान ,भद्रावती आयोजित विदर्भ स्तरीय 
"स्मृतिगंध" काव्य संमेलन,दि.१९/३/२०२३ ला श्री.गुंडावार सभागृहात संपन्न झाले."खुले कविसंमेलन" या सत्रात कविसंमेलनाध्यक्ष पद स्वीकारताना प्रत्येकच कविता लक्ष पूर्वक ऎकून तिला न्याय देण्याची फार मोठी जबाबदारी सांभाळावी लागली .ते समाधान अनुभवताना निश्चितपणे आनंद होतो.या कविसंमेलनात जवळ जवळ ३२ कवींनी सहभाग नोंदविला एका पेक्षा एक नवीन विषयांवरील कविता सादर झाल्यात त्यात चि.भूपेश या बाल कवीने "सॆनिक जन्म घेतील भारतात" ही देशप्रेम दर्शवणारी कविता सुरुवातीलाच सादर केली.खंत,कवितेच्या काठावर-हरितक्रांती,उंदीर,
बाप,लोकशाहीतील पत्रकारिता,घर,स्त्री,सवय,
 शिर्षक असलेल्या कवितांसोबतच, श्री.उसेवारांनी ,मार्मिक पण मिष्किल कविता सादर केलीत,पेंशन,माणसे वाचन, श्री.जितेश कायरकरची "तरुणी " ही कविता, श्रीमती दिव्या यांची "शक्ति की नारी" ही कविता तृप्तीचा ,सुखद अनुभव देऊन गेल्या ,वणव्यातील माती,अभंग आणि ५ गझल वाचल्या गेल्या त्या हृदयावरती अधिराज्य गाजवून गेल्या ,श्री.रितेश पराते यांची "प्रश्नांची गर्दी" ही कविता अनेक उत्तरे देऊन गेली.

 तर "मला पेटवायची आहे होळी" ही कविता नफरत आणि उद्वेग यांने व्यापलेली होती,भक्ती रस ओतलेले काही अभंग, पळस, सुक्ष्म देहातील माणूस,श्री.तराळे अतिशय वृध्द व्यक्तिमत्व यांनी "मद्यपान" या विषयावरची कुटूबं चा होणारा -हास या वर अभिव्यक्त झाले.शेतक-यांचे अश्रृ दर्शविणा-या शेवटच्या दोन कविता अस्वस्थ करुन गेल्या, "माणसा मधला माणूस" एक कोड सांगून जाणारी कविता...या  कविता ऎकताना कवितेचा दर्जा उंचावतो आहे हे नमूद करावेसे वाटते.सर्व कवींचे मनःपूर्वक अभिनंदन,उत्तम सहज सुंदर सूत्रसंचालन करणा-या श्रीमती आरती रोडे यांचे कॊतूक करायला हवे,आयोजक मा.श्री.प्रविणजी आडेकर आणि सहकारी यांचे मनापासून आभार यथोचित्त सन्मान केला.

Comments