वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख योगिता लांडगे व महिला पदाधिकार्यांनी आनंद उत्सव साजरा केला.

मुख्यमंत्र्याच्या अर्थसंकल्पावर शिवसेना शिंदे गट महिलांनी साजरा केला जल्लोष

फक्त बातमी 
चेतन लूतडे 

महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर  चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख योगिता लांडगे व महिला पदाधिकार्यांनी आनंद उत्सव साजरा केला.

राज्याचा २०२३-२४ वर्षाचा १६,११२ कोटी रुपये महसुली तुटीचा व पाच लाख ४७ हजार ४५० कोटी रुपये अंदाजित खर्चाचा अर्थसंकल्प गुरुवारी विधानसभेत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, तर विधान परिषदेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सादर केला.

 महिलांसाठी अर्थसंकल्पात भरीव कामगिरी असल्याचे मत महिलांनी व्यक्त केली.  

*मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात आणण्यात आली आहे.
*महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत देण्यात आली आहे.

*आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली आहे.

*शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती करणार आहे.

*स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार आहेत.

असे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याने महिला आघाडी तर्फे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन महिलानी केले आहे.  वरोरा येथील रत्नमाला चौकात बँड वाजवून पेढे वाटून हा आनंद साजरा केला.

याव्यतिरिक्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष शेतकऱ्यांना मिळणार असून महाराष्ट्रातील विमानतळ, स्मारक, व पर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न केले आहे.

त्यामुळे हा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत महिला जिल्हाप्रमुख शिवसेना योगिता लांडगे व जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी व्यक्त केला. यावेळी वरोरा येथील रत्नमाला चौकात शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Comments