लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

मुख्यमंत्री साहेब...!वीज बिल दरवाढीची सखोल चौकशी करा

मुख्यमंत्री साहेब...!
वीज बिल दरवाढीची सखोल चौकशी करा 

ग्राहक पंचायत भद्रावतीची मागणी 

रवी बघेल भद्रावती
२८/०७/२२

भद्रावती : इंधन समायोजन आकार या नावाखाली महावितरण कंपनीने नुकतीच केलेली वीज दरवाढ ही संशयास्पद असून ग्राहकांवर अन्यायकारक आहे. वीज निर्मितीसाठी वाढलेल्या खर्चा पोटी वीज दरवाढीचा ग्राहकांनाच देण्यात आलेला हा मोठा धक्का असून महावितरण काहीतरी लपवाछपवी करत आहे. असा संशय घेण्यासाठी पुरेसा वाव आहे. त्यामुळे शासनाने या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित दोशींवर कारवाई करावी आणि ग्राहकांना दिलासा द्यावा. अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांच्या मार्गदर्शनात ग्राहक पंचायत भद्रावती यांनी माननीय मुख्यमंत्री यांना तहसिलदार भद्रावती यांच्या मार्फत केली आहे.

महाराष्ट्रातील सुमारे २ कोटि ७५ लाखाहुन अधिक ग्राहकांवर प्रतीमाह ११५० कोटी रुपयांचा बोजा जून ते ऑक्टोबर या कालावधीत पडणार असून सरासरी अतिरिक्त बोजा प्रति युनिट १.२५ पैसे पडणार आहे. हा बोजा ५ महिन्यांसाठी २० टक्क्यांपेक्षाही जास्त असण्याचा संभव आहे. घरगुती ग्राहकांसाठी प्रत्येक युनिट मागे ६५ पैसे असा आकार असला तरी व्यापारी वर्गासाठी तो प्रति युनिट किमान २ ते २.५० रुपये असा राहणार आहे. याचाही अप्रत्यक्ष भार ग्राहकांना सहन करावा लागणार आहे. सामान्य परिस्थितीत १७.१८ टक्के दरवाढ समजण्यासारखी आहे. परंतु इंधन समायोजन आकाराच्या नावाखाली केलेली ही दरवाढ अनाकलनियच आहे. वीज निर्मिती खर्च खरोखरच वाढलेला नसताना हा मोठा बोजा ग्राहकांवर का? वास्तविक पाहता महाजेनको ने वीज निर्मितीचे आपले लक्ष पूर्ण न केल्यानेच ही स्थिती निर्माण झाली आहे, असे ग्राहक पंचायतीचे मत आहे.

कर्मचारी वर्गाच्या अकार्यक्षमतेमुळे निर्माण झालेल्या अडचणीमध्ये बळी मात्र सर्वसामान्य ग्राहकांचा दिला जात आहे. वीज निर्मितीत कमी पडल्यामुळे खाजगी पावर प्लांट मधून अतिरिक्त वीज घ्यावी लागली याला जबाबदार कोण? याची चौकशी शासनाने करावी अशी ग्राहक पंचायत, भद्रावतीने या निवेदनाच्या माध्यमातून शासनाला केली आहे. कंपनीने प्रस्तावित केलेल्या दरवाढीला सहजपणे मान्यता देणारा वीज आयोग यासंदर्भात ग्राहकांना विश्वासातच घेत नसून हा संपूर्ण मामला महावितरण कंपनी आणि वीज नियामक आयोग या दोन मधला आहे.

बीज नियमक आयोगात महावितरणचेच हित जोपासले जाते हाच आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे नियामक आयोगात किमान एक तरी ग्राहक वर्गाचे प्रतिनिधित्व करणारा ग्राहक संघटनेचा कार्यकर्ता असावा अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. नारायण मेहरे, नितीन काकडे, डॉ. अजय गाडे तसेच ग्राहक पंचायत, भद्रावतीचे अध्यक्ष वामन नामपल्लीवार, पुरुषोत्तम मते, वसंत वर्हाटे, अशोक शेंडे, सुदर्शन तनगुलवार, मोहन मारगोनवार आणि प्रविण रामचंद्र चिमुरकर यांनी केली आहे.

Comments