वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

जयंत टेमुर्ड यांची वरोरा भद्रावती विधान सभेसाठी राष्ट्रवादीपक्षात अध्यक्षपदी निवड

जयंत टेमुर्ड यांची वरोरा भद्रावती विधान सभेसाठी राष्ट्रवादीपक्षात अध्यक्षपदी निवड
वरोरा:--राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार, प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या संमती ने जयंत मोरेश्वर टेमुर्डे यांची वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र ,अध्यक्ष पदी निवड  करण्यात आली,मोहबाळा ग्रा पं चे माजी सरपंच राहिलेले जयंत टेमुर्डे यांनी नागरिकांसाठी औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपन्यांना गावात सुविधा निर्माण करण्यास भाग पाडले होते,मनमिळावू स्वभावाचे सर्वांच्या भावना ,समस्या शांततेने ऐकून घेणारे अशी ओळख असणारे ,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी लक्षात घेऊन यांची या पदी नियुक्ती करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे,सन २००७-२२ पर्यंत या पदावर असणारे विलास नेरकर यांनी १५वर्षाच्या कारकिर्दीत पक्ष वाढीसाठी कोणत्याही प्रकारचे भरीव कार्य न केल्याने त्यांच्याकडून हि जबाबदारी काढून टाकण्यात आली . राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजुभाऊ वैध, मा टेमुर्डे साहेब सुनील देहगावकार जिल्हा उपाध्यक्ष अविनाश ढेंगळे ,जिल्हा सरचिटणीस राजू वरघणे शहरअध्यक्ष बंडू भोगाडे तालुकाअध्यक्ष विशाल पारखी शहर उपाध्यक्ष चंद्रकांत कुंभारे विधानसभा उपाध्यक्ष बंडू खारकर नितेश भांदेकर,अतुल वानखेडे, अरुण सहारे,रंजना पारशिवें मुकेश वाटकर, तात्यांजी चौधरी, बापूराव नंनावरे,श्रीहरी पावडे,लता हिवरकर, जनाबाई पिंपळशेंडे सुशीला तेलमोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जयंत टेमूडे याना पुढील राजकीय वाटचालीसाठी कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.

Comments